अतिवृष्टीचा अणदूर-धुंदवडे रस्त्याला फटका, भूस्खलन होवून रस्ता खचला

2021-07-25 795

असळज(Asalaj) : गगनबावडा(Gaganbawada) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा(Heavy Rain) फटका अणदूर-धुंदवडे(Andoor-Dhundwade) या रस्त्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे अणदूर ते धुंदवडे या रस्त्यावर भूस्खलनाची(Landslide) घटना घडली आहे. या मार्गावर डांबरी रस्ता काही फूट भूस्खलन होवून खचला आहे. त्यामुळे या मार्गावर अनिश्चित काळासाठी वाहतूक बंद राहणार आहे.
अणदूरहून धामणी खोरीत ये- जा करणेसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो. धामणी खोरीत बहुतांशी वाहतुक याच मार्गाने होत असते. मात्र हा रस्ता खचल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. पर्यायी बोरबेट व परखंदळे मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
#AndoorDhundwadeLandslide #Asalaj #Gaganbawada #AndoorDhundwadeRoad #Kolhapur #Landslide #HeavyRains